- आमच्याबद्दल
ग्रामदेवता :- भैरवनाथ
ऐतिहसिक वारसा :- मल्हार गड
ग्रामपंचायत सोनोरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे स्थित आहे. हे गाव ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले असून मुख्यतः शेती, दुग्धव्यवसाय आणि शेतीपूरक व्यवसायावर गावकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. गावातील नागरिक एकोपा, संस्कृती आणि परंपरा यासाठी प्रसिद्ध आहेत.
-
ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायत कार्यकाल :
दि. १५/१/२०२१ ते दि. १५/१/२०२६
सरपंच : सौ. श्रद्धा राहुल काळे
ग्रामपंचायत सोनोरी गावाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. -
उपलब्धी
ग्रामपंचायत सोनोरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आला.
-
भविष्यातील योजना
1.सांडपाणी व्यवस्थापन व पावसाच्या पाण्याचे संधारण प्रकल्प.
2.युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करणे.
3.महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन व आर्थिक सक्षमीकरण.
4.पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड मोहीम.
-
भौगोलिक व प्रशासकीय माहिती
क्षेत्रफळ व जमीन माहिती
- एकूण क्षेत्रफळ : 1289 हेक्टर 49 आर
- वनविभाग : 188.58
- गैर रान : 0.32 आर
- कुरण : 15.78
- गावठाण : 6 हेक्टर 23 आर
- लागवड योग्य : 1019 हेक्टर 90 आर
- पोट खराबा : 104 हेक्टर
लोकसंख्या व शिक्षण
| एकूण लोकसंख्या (२०११) | 2409 (स्त्री: 1209, पुरुष: 1200) |
|---|---|
| वय 0-6 | 323 (स्त्री: 168, पुरुष: 155) |
| SC | 300 (स्त्री: 152, पुरुष: 142) |
| ST | 22 (स्त्री: 10, पुरुष: 12) |
| शिक्षित | स्त्री-82.60%, पुरुष-89.15% |
ग्रामपंचायतविषयी माहिती
ग्रामपंचायतविषयी माहिती
ग्रामपंचायत ही भारतातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेची एक मूलभूत पायरी आहे. प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्थापन केली जाते आणि तिच्या माध्यमातून गावाचा विकास व व्यवस्थापन केले जाते. ग्रामसभा ही ग्रामपंचायतीची सर्वोच्च संस्था असून गावकऱ्यांच्या सहभागातून निर्णय घेतले जातात.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्या माध्यमातून कार्य करते. गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, गटारी, जन्म-मृत्यू नोंदणी यांसारखी मूलभूत कामे ही संस्था पाहते. तसेच मनरेगा, शिक्षण, आरोग्य व सामाजिक न्याय यांसारख्या शासकीय योजना गावात राबवण्याची जबाबदारी देखील ग्रामपंचायतीची असते.
ग्रामपंचायतीला केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळतो. त्याचबरोबर ती गावकऱ्यांकडून कर आकारू शकते. ग्रामपंचायत ही खऱ्या अर्थाने लोकशाहीची शाळा मानली जाते कारण ती लोकांच्या थेट सहभागातून कार्य करते व गावाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावते.
ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काम करणारी संस्था आहे. गावात पाणी, वीज, रस्ते, गटारे, स्वच्छता, शाळा अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तिच्यावर असते. ग्रामपंचायत गावकऱ्यांकडून थेट निवडून आलेल्या प्रतिनिधींनी बनलेली असल्याने लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
ग्रामपंचायत केवळ विकासकामेच करत नाही तर गावात शिस्त, स्वच्छता व आरोग्य यांबद्दल जनजागृतीही करते. विविध शासकीय योजना, रोजगार हमी योजना, महिला-बालविकास योजना या ग्रामपंचायतीमार्फत राबवल्या जातात. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ग्रामपंचायत ही महत्त्वाची कडी ठरते.